सिंधू संस्कृती आठ हजार वर्षांपूर्वीची

सोमवार, 30 मे 2016 (12:27 IST)
प्राचीन सिंधू संस्कृती ही 5500 वर्षांपूर्वीची नसून 8 हजार वर्षांपूर्वीची असल्याची नवी माहिती खरगपूर येथील इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने केलेल्या संशोधनात समोर आली आहे. 
 
नेचर या नियतकालिकाच्या 25मे च्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनातील निष्कर्षावर प्राचीन संस्कृतीच्या कलावधीबाबत संपूर्ण जगाला पुनविर्चार करणे आवश्यक आहे. तसेच ही हडप्पा संस्कृती ही एक हजार वर्षांपूर्वीची असल्याचेही संशोधनात म्हटले आहे. याशिवाय या सिंधू संस्कृतीच्या र्‍हासाच्या कारणांचाही अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये वातावरणातील बदलामुळे सिंधू संस्कृती नष्ट झाल्याचे म्हटले आहे. 
 
आम्हाला अशितय प्राचीन मातीची भांडी मिळाली. त्यावरून आम्ही ऑप्टिकली स्टिम्युलेटेड लिमिसेन्स तंत्र वापरून या प्राचीन कालावधीचा अभ्यास केला. त्यातून सिंधू संस्कृती ही 8000 वर्षांपूर्वीची असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती आयआयटीच्या भुरचनाशास्त्राचे प्रमुख अनिद्य सरकार यांनी  दिली. सिंधू संस्कृती सध्या समजण्यात येत त्यापेक्षा कितीतरी अधिक विस्तिर्ण भागात पसरली असल्याचे संशोधकांना वाटते. तीचा विस्तार सध्या लुप्त झालेल्या सरस्वती नदी किंवा घग्गर-हकरा नदीपर्यंत पसरलेला असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे. 

वेबदुनिया वर वाचा