चमत्कारापेक्षा कमी नाही 27 व्या आठवडय़ात जन्मलेल्या या मुलीची कथा

रविवार, 30 ऑगस्ट 2015 (22:13 IST)
आपल्या मनाला भावनारा हा फोटो जेव्हा ही मुलगी 25 दिवसांची होती तेव्हाचा आहे. पहिल्यांदा तिच्या वडिलांनी तिला आपल्या जवळ घेतलं होतं. फोटो पाहून आपल्याला कळू शकतं मुलगी किती छोटी आहे ते. वडिलांच्या अंगठीपेक्षाही तिचे हात बारीक आहेत. 
 
मॉली पेरिनचा जन्म 27 एप्रिलला झाला. 27 व्या आठवडय़ातच तिचा जन्म झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं ती एका असाध्य रोगाने पीडित आहे. डॉक्टरांनी दु:खी आई-वडील स्टेफनी आणि जेम्सला पहिलेच सांगितलं की, मुलगी तीन आठवडय़ांपेक्षा जास्त जगू शकणार नाही.
 
मात्र मॉलीच्या जबरदस्त इच्छाशक्तीनं डॉक्टरांना चुकीचं सिद्ध केलं. तीन आठवडय़ांनंतर ती आई-वडिलांच्या कुशीत होती आणि आज ती 17 आठवडय़ांची झालीय. पूर्व यॉर्कशायरमध्ये राहणारं हे कुटुंब आता आपल्या मुलीला घरी नेण्याची तयारी करतंय. जेम्सचं म्हणणं आहे की, त्याला आणि त्याच्या पत्नीला आतापर्यंत विश्वास बसत नाहीय, की ते आता आपल्या मुलीला घरी नेणार आहेत.  
 
27 एप्रिलला स्टेफनीचं सी-सेक्शन करून मॉलीचा जन्म झाला. त्यानंतर स्टेफनीही दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये होती.

वेबदुनिया वर वाचा