सुरत येथील डॉक्टरांना एका युवकाचा रक्तगट पाहून हैराण होण्याची वेळ आली आहे. हा रक्तगट कुठल्याच रक्तगटाशी मॅच झालेला नाही व जगातही या रक्तगटाचे कुणी असेल याची खात्री नाही असे ही रक्त तपासणी करणारे डॉक्टर सन्मुख जोशी व किंजल मेंडपुरा यांनी सागितले. या रक्ताची सँपल जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठविली गेली असून त्यांनीही हा रक्तगट नवीनच असल्याचे सर्टिफाय केले आहे. सध्या या रक्तगटाला आयएनआरए असे नाव दिले गेले आहे. त्यातील पहिली दोन अक्षरे इंडियासाठी तर दुसरी दोन अक्षरे संबंधित व्यक्तीची आद्याक्षरे आहेत.