युवी बनला आता डॉ. युवराज सिंग

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगला खेळातील योगदानासाठी ग्वालियरच्या आयएमटी विश्वविद्यालयने दर्शन शास्त्रमध्ये डॉक्टरेट मानद पदवीने त्याला गौरविले आहे. म्हणजेच यापूढे फक्त युवराज सिंग नाही तर डॉक्टर युवराज सिंग असे संबोधल जाणार आहे. हा सन्मान डॉ.  ए.एस. के (अंतरिक्ष विज्ञान), गोविंद निहलानी (चित्रपट), डॉ अशोक वाजपेयी (कवी), रजत शर्मा (मीडिया), डॉ आर.ए. माशेलकर ( विज्ञान आणि तंत्रज्ञान) आणि अरुणा रॉय (सामाजिक कार्य) यांना आपपल्या क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी देण्यात आला आहे. 
 
डॉक्टरेट पदवी सन्मानित केल्यानंतर मला माझ्याअतिरिक्त जबाबदारीची जाणीव होत आहे. मी माझ्या कामांमधून इतरांसाठी उदाहरण बनू इच्छितो.  युवराजने देशासाठी चारशे पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दहा हजारपेक्षा अधिक रन्स काढले आहेत. 
 
भारताचा टी -२० विश्वचषक २००७ आणि एकदिवसीय वर्ल्ड कप २०११ जिंकण्यात युवराजची महत्त्वाची भूमिका राहीली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती