युवराज सिंगचे आयुष्य एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटापेक्षा नक्कीच कमी नाही. स्टुअर्ट ब्रॉडला सहा षटकार खेचणे असो, विश्वचषक स्पर्धेचा मालिकावीर बनणे असो, प्रसिद्ध बॉलिवूड नायिकेसोबत रोमान्स करणे असो वा कॅन्सरला मात करणे असो त्याचे पूर्ण आयुष्य रोमांचाने भरलेले आहे. त्यामुळे युवराज सिंगच्या आयुष्यावर चित्रपट यावा अशी अपेक्षा जर निर्माते आणि चाहते करीत असतील तर त्याच काहीच गैर नाही.