ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी केली. कमिन्सने सामन्याच्या पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. कमिन्सच्या शानदार गोलंदाजीच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 138 धावांवर ऑलआउट झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 212 धावा केल्या होत्या, त्यामुळे कांगारू संघाला 74 धावांची आघाडी मिळाली.
ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने सहा विकेट घेतल्या, तर मिशेल स्टार्कने दोन आणि जोश हेझलवूडला एक यश मिळाले. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी इतकी खराब होती की संघाचे फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कमिन्सची ही कामगिरी WTC फायनलमधील कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे. या बाबतीत कमिन्सने काइल जेमिसनला मागे टाकले.
कमिन्सने कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण केले आहेत आणि असे करणारा तो आठवा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे. कमिन्स ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहावा क्रमांक पटकावला आहे. तो ग्लेन मॅकग्रा, मिशेल स्टार्क, डेनिस लिली, मिशेल जॉन्सन आणि ब्रेट ली यांच्या यादीत सामील झाला आहे.त्याने भारताच्या जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे.