प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने मुंबईविरुद्ध 162 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने ही धावसंख्या 18.1 षटकांत गाठली. या सामन्यात हैदराबादचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
वानखेडेसारख्या खेळपट्टीवरमुंबईकडून विल जॅक्सने सर्वाधिक 2 बळी घेतले. विल जॅक्सने 4.70च्या इकॉनॉमीसह 3 षटकांत2 बळी घेतले. याशिवाय संघाकडून ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. मुंबई इंडियन्सकडून दीपक चहर सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने 4 षटकांत 11.80 च्या इकॉनॉमीने 47 धावा दिल्या.