यास्तिका भाटियाचे अर्धशतक हुकले आणि 37 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 44 धावा केल्यानंतर तो धावबाद झाला. यानंतर हरमनप्रीत कौर आणि अमेलिया कार यांनी चौथ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. अमेलिया 19 धावा करून बाद झाली. त्याचवेळी इसाई वँगला खातेही उघडता आले नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरने झंझावाती अर्धशतक ठोकले, पण अर्धशतकानंतर तिने तिची विकेट गमावली. हरमनप्रीतला गार्डनरने हरलीन देओलच्या हाती झेलबाद केले.
हरमनप्रीतने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. हुमैरा काझी (2) आणि अमनजोत कौर (0) यांना फार काही करता आले नाही. धारा गुजरने एक धाव आणि जिंतीमणी कलिता याने दोन धावा केल्यानंतर नाबाद राहिले. गुजराततर्फे अॅश्ले गार्डनरने तीन बळी घेतले. तर किम गर्थ, स्नेह राणा आणि तनुजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.