मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सांगितले आहे की तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छितो. तसेच, बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहेअशी माहिती समोर आली आहे. तसेच एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'कोहलीने आपले मन बनवले आहे आणि तो कसोटी क्रिकेट सोडणार असल्याचे बोर्डाला कळवले आहे. इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा लवकरच येत असल्याने बीसीसीआयने त्याला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. कोहलीने अजून या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही.