विराट कोहलीने सोडलं कसोटीचं कर्णधारपद, पदावरून दिला राजीनामा

शनिवार, 15 जानेवारी 2022 (19:15 IST)
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यांने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. 
दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या कसोटी मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपदाचा  राजीनामा दिला आहे. पहिल्यांदा एकदिवसीय, T20 नंतर  आता कसोटी कर्णधारपदाच्या जबाबदारीतून कोहलीने मुक्त होण्याचे निर्णय घेतले आहे.

यासह कोहलीने गेल्या तीन महिन्यांत तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले आहे. टी-20 विश्वचषकानंतर त्याने टी-20 चे कर्णधारपद सोडले. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. आता कोहलीने कसोटीचे कर्णधारपदही सोडले आहे.
 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कोहली कसोटी कर्णधार झाले. ते टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती