ऑनलाईन गेमिंगची जाहीरात :सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर जोरदार आंदोलन

गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (11:12 IST)
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मुंबईतील सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
 
भारततत्न असलेल्या व्यक्तीने ऑनलाइन गेमची जाहिरात करुन तरुणांमध्ये चुकिचा संदेश देऊ नये, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. या संदर्भात बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. ज्यात सचिनने ऑनलाइन जाहिरातीतून माघार घ्यावी असे म्हटले होते, नाहीत त्याच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. त्यानुसार आज आंदोलन करण्यात आले.
 
सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमची जाहिरात केल्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा विरोध आहे. अशात प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेंडुलकर यांच्या घराबाहेर जमले असता त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती