अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्त

शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (14:34 IST)
दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाचा अर्थ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतलेला हा महान खेळाडू आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. निवृत्तीनंतर त्यांनी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि विराट कोहलीच्या संपूर्ण संघाचे आभार मानले आहेत. त्यांनी  लिहिले, “मी आरसीबीकडून खेळण्यासाठी बराच काळ दिला आहे. या वर्षी मी फ्रँचायझीला 11 वर्षे पूर्ण केली आहेत आणि आता मुलांना सोडून जाणे दुःखद  आहे. अर्थात, हा निर्णय घ्यायला  खूप वेळ लागला, पण खूप विचार विनिमय केल्यानंतर मी निवृत्ती घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी पुढे लिहिले, “माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि वर्षानुवर्षे मला पाठिंबा दिल्याबद्दल मी RCB व्यवस्थापन, माझा मित्र विराट कोहली, संघसहकारी, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, चाहते आणि संपूर्ण RCB कुटुंबाचे आभार मानू इच्छितो. तो एक अविश्वसनीय प्रवास आहे. आयुष्यभर जपण्यासारख्या कितीतरी आठवणी आहेत. आरसीबी नेहमीच माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या खूप जवळ असेल आणि मीया अद्भुत संघाला सपोर्ट करत राहील. मी कायमचा आरसीबियन आहे. मी माझ्या घरामागील अंगणात माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि तेव्हापासून हा खेळ पूर्ण आनंदाने आणि प्रचंड उत्साहाने खेळलो. वयाच्या ३७ व्या वर्षी आता  तो खेळ होत नाही . मला हे मान्य करावे लागेल. यामुळेच मी माझी निवृत्ती जाहीर केली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती