कोहली प्रमाणेच किवी कर्णधार केन विल्यमसननेही टी-20 मालिकेतून माघार घेतली
मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (13:09 IST)
विराट कोहलीप्रमाणेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही बुधवारपासून येथे सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला मुकणार आहे .कारण ते 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर लक्ष केंद्रित करणार. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दोन्ही कर्णधारांचा शेवटचा कसोटी सामना झाला होता ज्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता.
वेगवान गोलंदाज टिम साऊदी मर्यादित षटकांच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करेल, असे न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने येथे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
"बुधवारी संध्याकाळी टी-20 मालिकेतील पहिला सामना आणि त्यानंतरचे शुक्रवार आणि रविवारी रात्री होणारे सामने पाहता, विल्यमसन ने जयपूरमध्येच सराव करणाऱ्या कसोटी तज्ञांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.".
"टिम साऊदी बुधवारी पहिल्या T20 सामन्यात संघाचे नेतृत्व करेल तर काइल जेमिसन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स आणि मिशेल सँटनर दोन्ही मालिकेसाठी उपलब्ध असतील," असे प्रकाशनात म्हटले आहे. ,
उजव्या पायाच्या स्नायूंच्या ताणामुळे त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनची प्रकृती चांगली आहे आणि ते T20 मालिकेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जयपूर (17 नोव्हेंबर), रांची (19 नोव्हेंबर) आणि कोलकाता (21 नोव्हेंबर) खेळले जाणार .
टी-20 विश्वचषकानंतर टी-20चे कर्णधारपदही सोडणाऱ्या विराट कोहलीने बीसीसीआयकडे विश्रांतीची मागणी केली आहे. त्यामुळेच ते भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिकेत सहभागी होत नाहीये. पहिल्या कसोटीतही ते टीम इंडियाकडून खेळताना दिसणार नाही आणि कर्णधार अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात येणार आहे. विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आणि कसोटीचे कर्णधारपदही सांभाळणार.
केनला पुन्हा एकदा नंबर 1 कसोटी फलंदाज बनण्याची संधी आहे
केन विल्यमसन भारतात दोन कसोटी सामने खेळणार असून त्यांना जो रूटला मागे टाकून पुन्हा नंबर 1 कसोटी फलंदाज बनण्याची संधी असेल.
जो रूट सध्या 903 गुणांसह अव्वल, तर केन विल्यमसन 901 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, अॅशेसलाही सुरुवात होणार आहे आणि जो रूटला पुन्हा नंबर 1 रँक मिळवण्याची संधी असेल.