भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दोन्ही संघांमध्ये प्रथम टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. जे 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिका 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाईल.
श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ
T20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज
एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा