T20 World Cup:या संघाच्या स्टार खेळाडूंचे सामान चोरीला

सोमवार, 3 जून 2024 (18:41 IST)
T20 World Cup 2024 चे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका करत आहेत. दरम्यान, एका टीमशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. या संघाच्या खेळाडूंचे सामान चोरी ला गेले असून उड्डाणाला विलंब झाला आहे. चोरीचा माल परत मिळाला असून हा संघ 5 जून पासून टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. 

ऑस्ट्रेलिया संघ सध्या टी -20 विश्वचषकात सहभागी होण्यासाठी वेस्टइंडीजला पोहोचला असून संघ हरवलेले सामान, उड्डाणाला होणारा विलंब आणि जोरदार वाऱ्यामुळे हैराण झाला.हा संघ 5 जून रोजी ओमान विरुद्ध विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 
 
वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क काही काळ आयपीएल खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाला परतले होते. यानंतर वेस्ट इंडिजला जात असताना कमिन्सचे सामान हरवल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, कमिन्सचे सामान नंतर सापडले. 
 
 फ्लाइटच्या विलंबामुळे स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनाही अडचणींचा सामना करावा लागला. याच कारणामुळे दोघांना लॉस एंजेलिसमध्ये एक रात्र काढावी लागली.
T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.
प्रवासी राखीव- मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर-मॅकगुर्क

Edited By - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती