सतत कॅप का घालते शिखर धवनची बायको, चाहत्यांसाठी अखेर उघडले रहस्य

दिल्लीचे स्टार फलंदाज शिखर धवनची बायको आयशा धवन आत्मनिर्भर महिला आहे, तिने कधीही आपल्या आविष्यातील निर्णय इतर कुणा घेऊ दिले नाहीत. आवड म्हणून बॉक्सिंग करणारी आयशा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दररोज ट्रेनिंग घेते. या व्यतिरिक्त ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. चाहत्यांच्या प्रश्नाचे बिंदास उत्तर देत ती त्यांसोबत जुळलेली असते.
 
आयशा अनेकदा क्रिकेट मॅचेसमध्ये आपल्या पतीचा उत्साह वाढवण्यासाठी मैदान पोहचते. मात्र एक गोष्ट जी सर्वांचा ध्यानात आली की आयशाने नेहमीच कॅप घातलेली असते.
 
नेहमी टोपी घालण्यामागील कारण काय असे प्रश्न आयशाला विचारण्यात आले. आयशाने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत म्हटले की हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात येत आहे आणि अनेक लोकं याबद्दल जाणून घेण्यास फार उत्सुक देखील आहेत तर आज मी यामागील कारण सांगते.
आयशाने लिहिले की मी आपला वेळ फालतू विचार करण्यात आणि निर्णय घेण्यात घालवत नसते. मला आविष्यात सर्वात महत्त्वाचे आहे मी त्यासाठी प्रयत्न करते. मला फिट राहणे आवडतं म्हणून मी फिटनेसवर लक्ष देते.
 
फिटनेस ट्रेनिंगनंतर मला कुटुंबाची काळजी घ्यायची असते. मी घरातील काम स्वत:करते, जेवण स्वत: तयार करते, सफाई, मुलांना शाळेत सोडणे, व्यवसायाकडे लक्ष देणे, मुलांसोबत खेळणे आणि आपल्या यू-ट्यूब अकाउंटसाठी व्हिडिओ तयार करण्याचे काम करते.
आयशाने लिहिले की इतके काम केल्यानंतर मी आपला वेळ केस नीटनेटके ठेवण्यात वेळ घालवू शकता नाही. केसांसाठी खूप वेळ देणे माझ्यासाठी शक्य नाही. याऐवजी मी ती काम करते जी माझ्यासाठी अधिक आवश्यक आहे। मी स्वत:ला पालक आणि व्यवसायी या रूपात बघते. जिथे मी आपल्या क्षमतांचा योग्य वापर करते. प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास असतात, ज्यातून मी स्वत:साठी आपले काम निर्धारित केले आहेत. 
 
उल्लेखनीय आहे की आयशा मेलबर्न येथे राहणारी ब्रिटिश बंगाली आहे. पती शिखरहून वयाने 10 वर्ष मोठी आहे. शिखरशी विवाह करण्यापूर्वी ती विवाहित होती आणि तिला दोन मुले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती