गुरुवार, 21 सप्टेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ आणि मलेशिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे हा सामना सुरुवातीला 15-15 षटकांचा ठेवण्यात आला होता मात्र दुसऱ्या डावात पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात युवा सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने भारतीय महिला संघाच्या वतीने आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला.
जेमिमाह रॉड्रिग्सने 29 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 47 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने 7 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 21 धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात मलेशियाच्या महिला संघाला केवळ दोन चेंडूच फलंदाजी करता आली, त्यानंतर पुन्हा पावसाने सामना विस्कळीत केला.