ICC World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च

बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (14:44 IST)
ICC World Cup 2023 : पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या ICC विश्वचषक 2023 साठी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली. वास्तविक,एडिडास (Adidas) ने वर्ल्ड कपसाठी भारताच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच तीन पट्ट्यांऐवजी चमकदार तिरंगा दाखवण्यात आला आहे. 
 
प्रसिद्ध गायक रफ्तारच्या '3 का ड्रीम' गाण्याद्वारे बहुप्रतिक्षित जर्सी रिलीज करण्यात आली आहे. 'ड्रीम ऑफ 3' हे लाखो चाहत्यांचे प्रतीक आहे ज्यांना 1983 ते 2011 नंतर त्यांचा संघ तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकताना पाहायचा आहे. 
 
भारतात खेळल्या जाणार्‍या या मेगा इव्हेंटचा आनंद घेण्यासाठी आदिदासने मेन इन ब्लू जर्सीमध्ये बदल केले आहेत. या नव्या जर्सीत खांद्यावरील तीन पांढऱ्या पट्ट्यांची जागा चमकदार तिरंग्याने घेतली आहे. BCCI लोगोमध्ये आता छातीच्या डाव्या बाजूला दोन तारे आहेत, जे भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाचे प्रतिनिधित्व करतात. 
///
 
भारत 8 ऑक्टोबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. 
यानंतर यजमान संघाला 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर14ऑक्टोबरला भारत पाकिस्तानविरुद्ध बहुप्रतिक्षित सामना खेळणार आहे.  
 







Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती