कोरोना लसीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू! डॉक्टरांनी दावा केला

गुरूवार, 22 जून 2023 (16:57 IST)
ऑस्ट्रेलियाचा महान लेग-स्पिनर शेन वॉर्नचा मार्च 2022 मध्ये मृत्यू झाला, परंतु त्याच्या मृत्यूची आजही चर्चा आहे. शेन वॉर्न थायलंडला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. मात्र त्यांचा मृतदेह व्हिलामधील खोलीत आढळून आला. वॉर्नच्या आकस्मिक मृत्यूची जगभरात चर्चा झाली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला, मात्र आता शेन वॉर्नच्या मृत्यूबाबतचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात खेळाडूचा मृत्यू कोरोनाच्या लसीमुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. वॉर्नच्या मृत्यूचे कारण कोरोनाची लस असू शकते, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. 
 
ही लस कोरोनापासून बचाव करण्यासाठी बनवण्यात आली आहे. या लसीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नने मृत्यूच्या 9 महिने आधी कोरोनाची लस घेतली होती.
 
शेन वॉर्नने mRNA लस घेतली. या लसीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटिश कार्डिओलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचा मृत्यूही याच कारणामुळे झाल्याचा दावा करण्यात आला होता.
 
शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 708 आणि एकदिवसीय सामन्यात 293 बळी घेतले. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये 55 सामन्यात 57 विकेट्स घेतल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती