पुरुषांनी रडणे काही गैर नाही, सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट

गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (12:12 IST)
पुरुषांनी रडू नये, पुरुषांनी रडणे म्हणजे तो दुर्बल, कमजोर असल्याचं समजलं जातं. परंतू माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ही गोष्ट मान्य नाही. पुरुषाने रडणे काहीही गैर नाही, आपले अश्रू दाखवणे म्हणजे कोणतीही शरमेची गोष्ट नाही, असं स्पष्ट मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं आहे. 
 
'जागतिक पुरुष आठवडा' निमित्त सचिनने एक भावूक पोस्ट केली सचिनने सोशल मीडियावर एक खुले पत्र लिहूले असून म्हटले आहे की पुरुषांनी रडू नये, तो रडणं म्हणजे कमजोर असल्याचा समज समाजात आहे. हा समज बदलायला हवा. अश्रूंना मोकळी वाट करून देणे यात गैर काय. उलट या गोष्टीमुळे व्यक्ती मजबूत होता. 
 
लहानपणापासून पुरुषांनी रडू नये, रडल्यामुळे पुरुष कमजोर बनतात असे शिकवले जाते. मी सुद्धा हीच समज बाळगून मोठा झालो. मात्र, माझी समज चुकीची होती. 
 
रडणं ही कमजोर असल्याचे प्रतीत नसून आपलं दु:ख दाखवण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी मोठ्या हिंमतीची आवश्यकता असते. यामुळे तुम्ही एक अधिक चांगली व्यक्ती बनू शकता. पुरुषांनी काय करावे आणि काय करू नये या मानसिकेतून बाहेर पडावे असंही सचिनने म्हटले.
 
सचिनने पत्रात म्हटले की तुम्ही लवकरच पती, वडील, भाऊ, मित्र, मार्गदर्शक आणि शिक्षक व्हाल. तुम्हाला इतरांसाठी उदाहरण बनावं लागेल. तुम्हाला मजबूत आणि साहसी व्हावं लागेल. पण, तुमच्या आयुष्यात असेही काही क्षण येतील जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, शंका आणि संकटांचा अनुभव होईल. अशी वेळही येईल जेव्हा तुम्ही अयशस्वी व्हाल आणि तुम्हाला रडायची इच्छा होईल. पण, अशावेळी नक्कीच तुम्ही तुमच्या अश्रूंना थांबवाल आणि स्वत:ला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करत कराल, कारण पुरुष हेच करतात. पुरुषांना हीच शिकवण देण्यात आली आहे की, पुरुष कधीही रडत नाही. रडल्याने व्यक्ती कमकुवत होतो.
 
सचिनने म्हटले की, मी माझ्या आयुष्यात 16 नोव्हेंबर 2013 ही तारीख कधीही विसरु शकत नाही. त्या दिवशी मी अखरेच्या वेळी पवेलिअनकडे परत जात होतो माझा कंठ दाटून आला होता आणि माझ्या डोळ्यातून अश्रू जगासमोर आले पण आश्चर्य म्हणजे मला त्यानंतर शांत वाटतं होतं. मला मजबूत असल्याची जाणीव झाली.
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

To the Men of Today, and Tomorrow! #shavingstereotypes

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

सचिनने म्हटले की या रुढीवादी विचारांच्या पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती