पूर्वी सोशल मीडिया केवळ एक सोशल प्लॅटफॉर्म होतं परंतू आता हे इन्कम सोर्स झालं आहे. टीव्ही आणि वृत्तपत्रांव्यतिरिक्त आता सोशल मीडियावर देखील जाहिराती बघण्यात येतात. मोठ्या-मोठ्या कंपन्या सेलिब्रिटीजला पैसे देऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकतात. यासाठी कलाकारांना चांगलीच रक्कम मोजली जाते. सोशल मीडियाच्या सेलिब्रिटीजच्या कमाईचा अंदाज आपण या गोष्टीवर लावू शकता की इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करण्यासाठी प्रियंका चोप्रा 1.8 कोटी रुपये फीस घेते. असा दावा एक एजेंसीच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.