बीसीसीआयकडून विराटच्या वक्तव्यावर नाराजी

शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:08 IST)
भारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या अधिकाऱ्यांने आपले मत व्यक्त केले असून त्यांनी विराटच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. चाहत्यांनी पाठ फिरवल्यास बीसीसीआय आणि खेळाडू दोघे अडचणीत येतील हे विराट विसरल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विराटचा  व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्याला विराटचे हे उत्तर आवडले नसल्याचे सोशल नेटवर्किंगवरून सांगितले आहे. त्याला टि्वटरवर अनेकांनी ट्रोलही केले आहे. आता याच प्रकरणावर बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी विराटला सुनावले आहे. आम्ही बीसीसीआयमध्ये क्रिकेट चाहत्यांचा सन्मान करतो आणि त्यांची आवड निवड आम्हाला महत्वाची वाटते.
 
विराटने व्यक्त केलेले मत चुकीचे असल्याचे सांगितले. विराटला हे लक्षात घ्यायला हवे की तो म्हणतो त्याप्रमाणे चाहते दुसऱ्या देशात गेले तर प्युमा वगैरेसारख्या कंपन्या त्याच्याबरोबर १०० कोटींचे करार करणार नाहीत. बीसीसीआयच्या कमाईवरही त्याचा परिणाम होईल आणि अर्थात असे झाले तर खेळाडूंच्या मानधानाला कात्री लागेल. जर त्याने बीसीसीआयबरोबर केलेला करार पाहिला तर त्याच्या लक्षात येईल या देश सोडून जा वक्तव्यामुळे त्याने करारातील काही नियमांचा भंग केला आहे. त्याने याआधी बीसीसीआयने नाइके कंपनीबरोबर केलेला करार मोडून प्युमाच्या कार्यक्रमासाठी इंग्लंडला जात करार मोडला होता त्याचप्रमाणे त्याने आत्ताही करारातील नियमांचे उल्लंघन केल्याचे चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती