सचिन तेंडुलकर बनले सांता क्लॉज, मुलांनी लुटला आनंद

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ख्रिसमसच्या निमित्ताने सांता क्लॉज बनले. पहिल्यांदा त्यांचा असा रूप पाहून लहान-लहान मुलं खूप रोमांचित झाले. 
 
सचिन, नेहमीच मुलांच्या आणि सामाजिक कार्याच्या मदतीसाठी पुढे असतात. यावेळी त्यांनी सांताचा रूप धारण केला आणि आश्रय चाइल्ड केअर सेंटर पोहोचले, जेथे त्यांनी वंचित मुलांबरोबर बराच वेळ व्यतीत केला, त्यांच्याबरोबर खेळले आणि ख्रिसमसचा आनंद घेतला. 
 
सचिन आल्याने मुलं खूप आनंदी झाले आणि सांता बनून त्याने मुलांना मोठी भेट दिली. एवढेच नव्हे तर मास्टर ब्लास्टर सचिनने मुलांना भेटवस्तू दिली आणि टेनिस बॉलने क्रिकेट देखील खेळला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती