पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात गुवाहाटी येथे खेळला जात आहे, ज्यामध्ये पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. गत सामन्याचे नायक यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले आणि एकूण 24 धावांपर्यंत भारताचे दोन विकेट पडल्या होत्या.
यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवसह रुतुराज गायकवाडने डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी झाली. सूर्या 39 धावा करून बाद झाला. यानंतर, गायकवाडने तुफानी फलंदाजी करत 57 चेंडूत 13 चौकार आणि सात षटकारांसह 123* धावा केल्या. त्याचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक होते.