IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 235 धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्यामुळे गोलंदाजांचे काम सोपे झाले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला केवळ 191 धावा करता आल्या आणि 44 धावांनी सामना गमावला. हा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. यासह यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि रुतुराज गायकवाड या त्रिकुटाने एक विक्रम आपल्या नावावर केला.
टी-20 क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके लावण्याची ही पहिलीच वेळ होती.टी-20 क्रिकेटमधील मागील चार सामन्यांमध्ये असे घडले होते, जेव्हा संघाच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके केली होती, परंतु एकाही प्रसंगी भारत त्यात सहभागी झाला नव्हता.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या त्रिकुटाने भारतासाठी अनेक विक्रम केले आहेत. हे तिघेही टी-20 मध्ये पहिल्या तीन स्थानांवर फलंदाजी करत असत, परंतु हे दिग्गज कधीही एकत्र अर्धशतक करू शकले नाहीत. भारताचा युवा T20 संघ चमकदार कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यातही भारताने 200 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला होता.