एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीत ऋषभ पंतने इतिहास रचला आहे. त्याने 89 चेंडूत शतक झळकावले आणि टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. एकवेळ भारताने 98 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यानंतर पंतने रवींद्र जडेजासोबत शतकी भागीदारी केली. एवढेच नाही तर पंतने 89 चेंडूत शतक झळकावून अनेक विक्रमही केले.
इंग्लंडमध्ये दोन शतके झळकावणारा तो पहिला विरोधी विकेटकीपर ठरला आहे. पंतने भारतात 31 पैकी फक्त 8 कसोटी सामने खेळले आहेत. उर्वरित कसोटी तो केवळ परदेशी भूमीवर खेळला आहे. आपल्या पाच कसोटी शतकांपैकी पंतने परदेशी भूमीवर चार शतके झळकावली आहेत. पंतने 89 चेंडूत शतक झळकावले. एजबॅस्टन मैदानावर हे सर्वात वेगवान शतक आहे.
पंत 80 धावांवर असताना त्याने कसोटीतही 2000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताकडून चौथा विकेटकीपर फलंदाज ठरला. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी, सय्यद किरमाणी, फारुख इंजिनियर यांनी कसोटीत दोन हजार धावा केल्या आहेत. धोनीने कसोटी कारकिर्दीत 4876 धावा केल्या.