BIG Breaking: राहुल द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती, न्यूझीलंड मालिकेतून पदभार स्वीकारणार आहे

बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (21:21 IST)
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक असेल. T20 विश्वचषक (T20 World Cup 2021) नंतर सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. द्रविड विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतून संघाची धुरा सांभाळणार आहे. राहुल द्रविड सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुख म्हणून काम पाहत आहे. अनेक कनिष्ठ खेळाडू घडवण्याचे श्रेय त्याला जाते. द्रविडचा करार 2023 पर्यंत असेल.
 
द्रविडचा विश्वासू पारस म्हांबरे यांना टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. याशिवाय विक्रम राठोर हे संघाचे फलंदाजी प्रशिक्षक असतील, तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या बदलीबाबत अद्याप कोणतेही नाव निश्चित झालेले नाही. राठोड यांनीही पुन्हा फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.
 
द्रविडला पगार म्हणून 10 कोटी रुपये मिळणार आहेत. गेल्या महिन्यातच त्यांची एनसीए प्रमुख म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. पण भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी बीसीसीआयला मजबूत उमेदवाराची गरज होती. गांगुली आणि जय शाह यांच्या दृष्टीने हे काम द्रविडपेक्षा चांगले कोणीही पार पाडू शकले नसते. त्यामुळेच त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंड मालिकेपासून तो ही जबाबदारी स्वीकारणार आहे. टीम इंडियाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 आणि 2 कसोटी मालिका खेळायची आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती