भारत-ऑस्ट्रेलिया संघांमधील तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतीची शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियापुढे कडव्या आव्हानाची अपेक्षा आहे. त्यापूर्वी पहिल्या टी-२० कर्णधार विराट कोहली इतर खेळाडूंसह कॅनबेरामध्ये बाहेर पडला आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्यानं कॅनबेरामधील एका कॅफेमधील सेल्फी आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे.
हार्दिक पांड्यानं पोस्ट केलेल्या सेल्फीमध्ये कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार के. एल राहुल, मयांक अग्रवाल आणि मयांकची पत्नी आशिता सूद दिसत आहेत. हार्दिक पांड्यानं सेल्फी पोस्ट करत कॅप्शनमध्ये Out and about beautiful sunny Canberra असं लिहिलं आहे.