अनुष्का शर्माने शेअर केला बेबी बंप फ्लॉन्ट करताना फोटो, करीना कपूरने म्हटलं...
सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (15:04 IST)
अनुष्का शर्मा आपला प्रेग्नेंसी पीरियड एंजॉय करत आहे. सध्या ती विराट कोहलीसह दुबईत आहे. तिने अलीकडेच बेबी बंप फ्लॉन्ट करत एक सुंदर फोटो शेअर केला. यावर करीना कपूरने लिहिले की तू सर्वात बहादुर आहे आणि सोबतच हार्ट इमोजी पोस्ट केलं.
अनुष्का शर्माने हा फोटो पोस्ट केल्यावर लगेच व्हायरल होऊ लागला. फोटो पोस्ट करत अनुष्काने लिहिले की 'एक नवीन जीवन देण्यापेक्षा वास्तविक आणि सुखद अजून काहीच असू शकत नाही. जेव्हा हे आपल्या हाती नसतं तर वास्तविकतेत काय असतं?
यावर विराटने देखील कमेंट करत लिहिले की एका फ्रेममध्ये माझे संपूर्ण जग...