Ireland vs New Zealand T20 World Cup: आज सुपर-12 फेरीतील गट एकमध्ये न्यूझीलंडचा सामना आयर्लंडशी होता. आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कर्णधारांनी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केला नाही. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 6 गडी गमावून 185 धावा केल्या. केन विल्यमसनने 35 चेंडूत 61 धावा केल्या.
न्यूझीलंडने आयर्लंडचा 35 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडचा उपांत्य फेरीतील दावेदार मजबूत झाला आहे. किवींचे आता पाच सामन्यांनंतर सात गुण झाले आहेत. त्याचबरोबर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी पाच गुण आहेत. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 6 गडी गमावून 185 धावा केल्या. केन विल्यमसनने 35 चेंडूत 61 धावा केल्या. आयर्लंडकडून जोशुआ लिटलने सर्वाधिक तीन बळी घेतले. जोशुआ लिटलने हॅटट्रिक घेतली. या विश्वचषकाची ही दुसरी हॅटट्रिक आहे. याआधी यूएईच्या कार्तिक मयप्पनने श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.