कसोटी क्रमवारीत विराट 1 नंबर

गुरूवार, 9 जानेवारी 2020 (16:25 IST)
आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वलस्थानी कायम आहे. तर कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या स्थानात घसरण झाली आहे. कोहलीचे 928 गुण आहेत. तर दुसर्‍या स्थानी असलेला ऑस्ट्रेलिाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याचे 911 गुण आहेत. पुजाराची एका स्थानाने घसरण झाली आहे. त्याचे 791 गुण असून, तो सहाव्या क्रमांकावर आहे. तर रहाणेची दोन स्थानांनी घसरण झाली असून 759 गुणांसह तो नवव्या स्थानी आहे.
 
आयसीसीने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. यात फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीचे अव्वलस्थान कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा दुसर्‍या स्थानी आहे. भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याची एका स्थानाने घसरण झाली आहे. तर रहाणेची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. पुजारा हा सहाव्या स्थानी असून, रहाणे नवव्या स्थानी आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 794 गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे. तर‍ फिरकीपटू  रविचंद्रन अश्विन हा 772 गुणांसह नवव्या आणि मोहम्मद शमी हा 771 गुणांसह दहाव्या स्थानी आहे.
 
ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशाने याने क्रमवारीत तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. 25 वर्षी मार्नसने न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात 215 आणि 59 धावांची खेळी केली होती. अलीकडेच झालेल्या या मालिकेत त्याने सर्वाधिक 549 धावा केल्या होत्या.
 
तर ऑस्ट्रेलिाचा वेगवान गोलंदाज पॅट कन्सि 904 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर नील वॅगनर हा 852 गुणांसह दुसर्‍या तर वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर हा 830 गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे. मिशेल स्टार्क पाचव्या स्थानी आहे. फिरकीपटू नॅथन लायन 14 व्या स्थानी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती