टी-२० क्रिकेटमध्ये धोनीच्या जागेसाठी राहुल उपयुक्त खेळाडू: गंभीर

सोमवार, 13 एप्रिल 2020 (22:41 IST)
देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामाची स्पर्धा होणं जरा कठीणच होऊन बसलं आहे. अशात अनेक दिवसांपासून मैदानात न उतरलेल्या महेंद्र सिंग धोनीसाठी भारतीय संघात पुनरागमनाची वाट ‍कठिण असल्याचे वक्तव्य गौतम गंभीर यांनी केले आहे. दरम्यान धोनीच्या जागेसाठी लोकेश राहुल योग्य पर्याय असल्याचंही गंभीरने म्हटलं आहे.
 
गंभीरने म्हटले की जेव्हा धोनीच्या जागेवर लोकेश राहुल यष्टीरक्षणाची संधी मिळाली, त्याने चांगली कामगिरी केली आणि आता फलंदाजी असो किंवा यष्टीरक्षक, तरी त्याचं यष्टीरक्षक हे धोनीइतक चांगलं नाहीये. पण टी-२० क्रिकेटचा विचार केला तर तो उपयुक्त खेळाडू आहे. तो यष्टीरक्षण करु शकतो आणि गरज पडल्यास फलंदाजी देखील करु शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती