आपल्या नेतृत्वाखाली भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारा महान अष्टपैलू कपिल देव लवकरच एक मोठा सन्मान मिळवणार आहे. हा सन्मान त्यांना त्यांच्या गावी मिळणार आहे. देशातील एका स्टेडियमला कपिल देव यांचे नाव देण्यात येणार असून हे स्टेडियम सध्या चंदीगडमध्ये आहे. चंदीगडमधील सेक्टर 16 क्रिकेट स्टेडियम कपिल देव स्टेडियम म्हणून ओळखले जाईल. यूटी क्रिकेट असोसिएशनने (UTCA) यासाठी पूर्ण तयारी केली आहे. कपिल देव यांनी त्यांची सुरुवातीची वर्षे या स्टेडियममध्ये घालवली.
सेक्टर 16 स्टेडियम हे कपिल देव यांचे होम ग्राउंड आहे. त्यांच्याशिवाय, युवराज सिंग आणि हरभजन सिंग हे देखील असे दोन खेळाडू आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात या स्टेडियममध्ये बरेच सामने खेळले आहेत. 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी डीपी आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली या मैदानावर आपली सुरुवातीची वर्षे घालवली.