12 मार्च रोजी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात झुलनला इतिहास रचण्याची संधी असेल. तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित षटकात 9 गडी गमावून 260 धावा केल्या. न्यूझीलंडकडून एमी सथर्टवेटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिने 75 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. याशिवाय एमिली कारने 50 धावा केल्या आहेत.