Jasprit Bumrah : क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का ,जसप्रीत बुमराह आशिया कप मधून बाहेर

सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (23:39 IST)
ज्येष्ठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाल्याची बातमी मिळताच सोमवारी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. या दुखापतीमुळे बुमराह आगामी आशिया कप टी-20 स्पर्धेतही खेळू शकणार नाही. बुमराहला यातून सावरण्यासाठी थोडा वेळ लागणार असून त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. टी-20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड सोमवारीच होणार होती, मात्र संध्याकाळपर्यंत त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
 
आशिया कप  टी-20 स्पर्धा 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. यापूर्वी ते श्रीलंकेत होणार होते, परंतु आर्थिक स्थिती खराब असल्याने ते यूएईमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती