IPL 2017 लिलावाला सुरुवात
इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वासाठी खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतच्या लिलावात इंग्लंडचे बेन स्टोक्स सिंकदर साबित झाले आहे. त्याला राइजिंग पुणे सुपरजाएंटसने 14.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. तो आईपीएलच्या या सिझनचा सर्वात महागडा क्रिकेटर साबित झाला आहे. तसेच मागील वर्षाच्या लिलावात स्टार बनणारा भारताच्या पवन नेगीला देखील या वर्षी खरीदार मिळाला आहे. त्याला रॉयल चँलेजर्स बग्लोरने 1 कोटीत खरेदी केली. मागील वर्षाच्या तुलनेत त्याला सात कोटी कमी मिळाले आहे.
कोणत्या खेळाडूवर कितीची बोली -
- इंग्लंडचा कप्तान इयॉन मॉर्गनला किंग्ज इलेव्हन पंजाबने 2 कोटींमध्ये खरेदी केले.
- इंग्लंडच्या बेन स्टोक्सला 14.50 कोटींची बोली, स्टोक्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स ताफ्यात.
- इरफान पठाणला कोणीही खरेदी केलं नाही.
- निकोलस पुरनची मुंबई इंडियन्सकडून 30 लाख रुपयांत खरेदी
- इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला खरेदीदार मिळाला नाही
- श्रीलंकेचा अॅजलो मॅथ्यूज आणि न्यूझीलंडचा कोरी अॅडरसन दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या ताफ्यात
- कोरी अँडरसनला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1 कोटीत खरेदी केलं.
- अँजेलो मॅथ्यूजला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 2 कोटीत खरेदीची
- कॅगिसो रबाडाची दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 5 कोटींमध्ये खरेदी
- टी. मिल्ससाठी विक्रमी बोली, 12 कोटींमध्ये आरसीबीकडून खरेदी
- मिचेल जॉन्सन मुंबई इंडियन्सकडून खेळणार, 2 कोटींमध्ये खरेदी
- प्रज्ञान ओझासाठी एकाही संघाने बोली लावली नाही
- इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून 12 कोटी रुपयांचा भाव
- न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टची कोलकाता नाईट रायडर्सकडून 5 कोटी रुपयांत खरेदी.
- ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून साडे चार कोटींची बोली
- ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनची मुंबई इंडियन्सकडून दोन कोटीत खरेदी
- वेस्ट इंडियन यष्टिरक्षक निकोलस पूरनची मुंबई इंडियन्सकडून फक्त 30 लाखात खरेदी
- तन्मय अगरवालला 10 लाखांच्या मूळ किमतीतच सनरायझर्स हैदराबादने केलं खरेदी
- राजस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून 2 कोटींची बोली.
- कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णाप्पा गौतमसाठी मुंबई इंडियन्सची दोन कोटींची बोली.
अॅपमध्ये पहा x