IPL 2021 : ऑपीएलचे उर्वरित सामने आज पासून MI आणि CSK चा आमना सामना होणार

रविवार, 19 सप्टेंबर 2021 (13:03 IST)
IPL 2021: आजपासून UAE मध्ये IPL 14 चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळले जाणार आहे.दोन्ही संघांमधील हा सामना अत्यंत रोमांचक असण्याची अपेक्षा आहे.आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील हे सामने सुमारे महिनाभर चालणार.आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. 
 
 
याआधी, भारतात आयपीएल 14 च्या पहिल्या टप्प्यादरम्यान,या वर्षीचा पहिला सामना मुंबई आणि चेन्नई दरम्यान झाला होता. या सामन्यात मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सामना जिंकला.या वर्षी आतापर्यंत चेन्नईची एकूण कामगिरी खूप चांगली झाली असली तरी. कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्या टप्प्यातील सात पैकी पाच सामने जिंकले होते आणि सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.तर पाच वेळा चॅम्पियन मुंबईने सात पैकी चार सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. 
 
आता पर्यंत झालेल्या सामन्यात मुंबई आणि चैन्नई दोन्ही संघाची कामगिरी उत्तम आहे.
आतापर्यंत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अनेक लीग आणि आंतरराष्ट्रीय टी -20 सामने खेळले गेले आहेत. आयपीएल 2020 मध्ये देखील या मैदानावर अनेक सामने खेळले गेले, ज्यात मुंबई आणि दिल्ली दरम्यान खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा समावेश आहे. 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने हा सामना पाच गडी राखून जिंकला आणि सलग दुसरे आणि त्याचे विक्रमी पाचवे आयपीएल जेतेपद काबीज केले.   
 
आपण आजचा सामना कुठे पाहू शकता? 
 
आज चेन्नई आणि मुंबई दरम्यान होणाऱ्या या सामन्याचे प्रसारण अधिकार स्टार इंडिया नेटवर्ककडे आहेत. आपण स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर हा सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकता. विशेष गोष्ट म्हणजे या वेळी आपण  स्टार इंडिया वाहिन्यांवर आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये हा सामना पाहू शकता. दुसरीकडे, जर आपण प्रवासात असाल किंवा  अशा ठिकाणी असाल जिथे टीव्ही नसेल, तर आपण मोबाईलवर डिस्ने हॉट स्टार की अॅपवर हा सामना पाहू शकता. यासाठी आपल्याला हॉटस्टारची सदस्यता घ्यावी लागेल. 
 
भारतीय वेळेनुसार हा सामना आज (रविवारी)संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल, संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.चैन्नई आणि मुंबई प्लेइंग इलेव्हन अशा प्रकारे असण्याची शक्यता आहे.
 
चेन्नई सुपर किंग्जसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन -  रॉबिन उथप्पा, ऋतूराज गायकवाड,सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायडू,एमएस धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा,शार्दुल ठाकूर, दीपक चाहर,इम्रान ताहिर आणि जोश हेजलवूड.
 
मुंबईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:  क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (c), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पंड्या, किरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती