इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, शमीचे पुनरागमन

रविवार, 12 जानेवारी 2025 (11:21 IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात वेगवान गोलंदाज शमीचे पुनरागमन झाले आहे. 2023 मध्ये झालेल्या विश्वचषकात शमीने भारतीय संघासाठी शेवटचा भाग घेतला होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो एक वर्षाहून अधिक काळ संघाबाहेर होता.
 
शमी या संघात परतला आहे. 34 वर्षीय शमीने रणजी ट्रॉफीद्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि टी-20 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही भाग घेतला. त्याशिवाय त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही भाग घेतला होता. मात्र गुडघ्याला सूज आल्याने तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला होता. त्यानंतर आता तो परतला आहे. तर ऋषभ पंतला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनला पहिली पसंती आहे. ध्रुव जुरेलचा दुसरा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. या मालिकेसाठी अक्षर पटेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
 
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती