ICC Awards: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा 2024 चा ICC चा सर्वोत्तम पुरुष T20 खेळाडू ठरला आहे. अर्शदीपने गेल्या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजने आयोजित केलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती आणि भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अर्शदीप अलीकडेच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
अर्शदीपने गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 18 सामन्यांत 36 विकेट घेतल्या होत्या. 2024 मध्ये तो या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. याआधी, तो रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्यासह ICC T20 आंतरराष्ट्रीय संघात देखील समाविष्ट होता.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमचाही समावेश होता. बाबर गेल्या वर्षी कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये टी-२० फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 23 डावात 33.54 च्या सरासरीने आणि 133.21 च्या स्ट्राईक रेटने 738 धावा केल्या, ज्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला तिसरा खेळाडू ठरला
आयसीसीशी बोलताना अर्शदीपने टी-20 विश्वचषक विजेतेपद संस्मरणीय असल्याचे सांगितले. अर्शदीप म्हणाला, आयसीसी पुरुषांचा सर्वोत्कृष्ट टी-20 खेळाडूचा पुरस्कार जिंकणे आनंददायी आहे. मी खूप आभारी आहे आणि देवाचे आभार मानतो. माझ्याकडून सर्वोत्तम मिळविण्यात मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना माझ्यासाठी खास क्षण होता. मला फक्त संघासाठी माझे सर्वोत्तम द्यायचे होते आणि चांगले निकाल द्यायचे होते.