India vs England 3rd T20:भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच T20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दोन सामने झाले असून तिसरा सामना 28 जानेवारीला होणार आहे. आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात इंग्लंडवर मात केली आहे.
भारताच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात जिथे अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. दुसऱ्या सामन्यात टिळक वर्मा हा ट्रबलशूटर म्हणून समोर आला. त्याने 72 धावांची खेळी खेळली आणि नाबाद परतला. आता तिसरा टी-२० सामना जिंकून मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल.
तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन असी असू शकते.संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा तिसऱ्या T20 सामन्यात सलामी करू शकतात. अभिषेकने पहिल्या T20 सामन्यात 79 धावांची तुफानी खेळी केली होती. गरज पडल्यास संजू मोठी इनिंगही खेळू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने दोन शतके झळकावली. तिसऱ्या क्रमांकावर टिळक वर्मा यांना संधी मिळू शकते. त्याने एकट्याने टीम इंडियाला दुसऱ्या T20 सामन्यात विजय मिळवून दिला. यापूर्वी, त्याने आफ्रिकेत सलग 2 टी-20 सामन्यांमध्ये शतके झळकावली होती
कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो. अष्टपैलू हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर संधी मिळू शकते.अर्शदीप सिंग भारतीय वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल यांनाही संधी मिळू शकते.
तिसऱ्या T20 सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.