रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अभिषेक शर्माच्या आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 247 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 10.3 षटकांत केवळ 97 धावा करू शकला आणि सर्वबाद झाला. अशाप्रकारे सूर्यकुमार यादवच्या संघाने इंग्लंडचा पराभव करत मालिका 4-1 अशी जिंकली.
डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन डकेटला मोहम्मद शमीने त्याचा बळी बनवले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात फिल सॉल्टशिवाय कोणताही फलंदाज इंग्लंडसाठी फार काळ टिकू शकला नाही. त्याने अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 55 धावांची खेळी खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला तर नऊ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने तीन तर वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी रवी बिश्नोईला यश मिळाले.
या सामन्यात डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने वन मॅन शो दाखवत 54 चेंडूत 135 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि 13 षटकार आले. त्यांच्याशिवाय सूर्यकुमार यादवने दोन, शिवम दुबेने30 धावा, हार्दिक पंड्याने नऊ धावा, रिंकू सिंगने नऊ धावा, अक्षर पटेलने 15 धावा केल्या.