प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ 49.2 षटकांत 261 धावांवर आटोपला. त्यांच्याकडून ताजमिन ब्रिट्सने सर्वाधिक 109 धावा केल्या. स्नेहा राणाने पाच तर अरुंधती रेड्डी, श्री चरणी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने लॉरा वोल्वार्ड आणि टॅझमिन ब्रिट्सच्या मदतीने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 140 धावांची मोठी भागीदारी झाली. लॉरा ४३ धावा करून बाद झाली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले.
पाच चौकारांसह 36 धावा काढून मंधाना बाद झाली. यानंतर, रावलला हरलीन देओलचा पाठिंबा मिळाला. दोघांनीही 73चेंडूत 68 धावा जोडल्या. लाबाने सलामीवीर प्रतिकाला बाद केले. 91चेंडूत 78 धावा करून ती बाद झाली. त्याने सलग पाचव्या डावात 50 पेक्षा जास्त धावा केल्या. तर, हरलीनने 29 धावा केल्या. तिच्याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने 41, रिचा घोषने 24 आणि दीप्ती शर्माने नऊ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर 41आणि काशवी गौतम पाच धावांवर नाबाद राहिली. दक्षिण आफ्रिकेतर्फे लाबाने 2 तर अयाबोंगा, क्लास, नादिन डी क्लार्क आणि ॲनेरी डर्कसेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.