IND vs ZIM : भारत झिम्बाब्वे विरुद्ध सलग चौथा सामना जिंकण्यासाठी उतरणार

शनिवार, 6 जुलै 2024 (15:59 IST)
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या फॉरमॅटमधून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाने नवा संघ तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच या मालिकेसाठी युवा संघाची निवड करण्यात आली असून त्याचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे.अभिषेक शर्मा, रियान पराग आणि हर्षित राणासारखे आयपीएलचे स्टार खेळाडू देखील संघाचा भाग आहे. 
 
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत एकूण आठ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यातील सहा सामने भारताने तर दोन झिम्बाब्वेने जिंकले आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा शेवटचा पराभव 2016 मध्ये झाला होता, जेव्हा झिम्बाब्वेने हरारे येथे भारताचा दोन धावांनी पराभव केला होता. याआधी 2015 मध्येही झिम्बाब्वे संघाने टीम इंडियाचा 10 धावांनी पराभव केला होता. 
 
भारतीय संघ गेल्या तीन सामन्यांमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरला नसून आज सलग चौथा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि झिम्बाब्वे शेवटचे 2022 च्या T20 विश्वचषकात आमनेसामने आले होते, जेव्हा टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला होता.
 
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेतील पहिला टी-20 सामना शनिवार, 6 जुलै रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये  T20 मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता खेळवला जाईल. टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 4 वाजता होईल.
 
झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० साठी टीम इंडिया: 
शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) , हर्षित राणा.

Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती