India vs West Indies 3रा T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (8 ऑगस्ट) होणार आहे. त्रिनिदादमध्ये टीम इंडियाचा पहिला T20 चार धावांनी हरला. यानंतर, गयाना येथे झालेल्या दुसऱ्या टी-20मध्ये दोन विकेट्सने पराभव केला. आता गयानामध्येच टीम इंडिया तिसऱ्या टी-20मध्ये पराभव टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाचा पराभव झाला तर मालिका गमवावी लागेल. अशा स्थितीत वेस्ट इंडिजला मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी मिळेल.
र वेस्ट इंडिजला केवळ दोन मालिकांमध्ये यश मिळाले. 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताचा शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर विंडीजने त्यांच्या भूमीवर एक सामन्याची मालिका 1-0 अशी जिंकली होती. यापूर्वी 2016 मध्ये वेस्ट इंडिजने त्यांच्या यजमानपदावर दोन सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती. अशा परिस्थितीत सहा वर्षांनंतर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका गमावू नये यासाठी भारताचा प्रयत्न असेल.