भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला गुरुवारी (3 ऑगस्ट) सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने चार धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. हा भारताचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील 200 वा सामना होता. टीम इंडिया हा सामना संस्मरणीय बनवू शकली नाही. या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. ICC ने हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेल्या संघाला दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर सामना जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघही त्यातून सुटू शकला नाही.
आयसीसी ने दंड ठोठावला आहे. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत किमान ओव्हर-रेटपेक्षा एक षटक कमी करण्यासाठी दोषी होता, तर वेस्ट इंडीज दोन षटके कमी होते. "एक षटक किमान ओव्हर रेटपेक्षा कमी गेल्यामुळे भारताला त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. किमान ओव्हर रेटपेक्षा दोन षटके खाली गेल्यामुळे वेस्ट इंडिजला त्यांच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे,हार्दिक आणि पॉवेल यांनी खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.22 मधील त्रुटी मान्य केली आहे .