भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 7 गडी गमावून 306 धावा केल्या. कर्णधार शिखर धवनने 72 आणि शुभमन गिलने 50 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली.
न्यूझीलंडच्या भूमीवर वनडे मधली ही त्याची सलग चौथी 50+ डाव होती. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. श्रेयसने यापूर्वी 107 चेंडूत 103 धावा, 57 चेंडूत 52 धावा, 63 चेंडूत 62 धावा केल्या होत्या. 2020 मध्ये भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर त्याने हे तीन डाव केले.
न्यूझीलंड दौऱ्यावर आलेल्या संघाच्या फलंदाजाने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. त्याच्या आधी पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाने ही कामगिरी केली होती. श्रेयसने आता रमीझ राजाची बरोबरी केली आहे. रमीझने न्यूझीलंड दौऱ्यावर वनडेमध्ये चार वेळा 50+ डाव खेळले. श्रेयसशिवाय संजू सॅमसनने 38 चेंडूत 36 धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने 16 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 37 धावांची खेळी केली.