भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात पुनरागमन करेल. कौटुंबिक कारणांमुळे रोहित शेवटचा वनडे खेळू शकला नाही. रोहितच्या पुनरागमनानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी कोण बाहेर पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हार्दिक पांड्याने मागच्या सामन्यात कर्णधारपदाची उत्तम कामगिरी केली होती. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला 188 धावांवर रोखले. यानंतर केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आणि त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याचवेळी रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. या सामन्यातही शमी, सिराज, राहुल आणि जडेजा यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असेल. त्याचबरोबर गेल्या सामन्यात भारतीय टॉप ऑर्डर अपयशी ठरत होती. त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
भारताचे संभाव्य प्लेइंग 11 : शुभमन गिल, इशान किशन/रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (क), रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव/अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
ऑस्ट्रेलियाः ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर/मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, अॅलेक्स कॅरी, शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.