माजी भारतीय क्रिकेटपटू नमन ओझाचे वडील व्हीके ओझा यांना मुलताई पोलिसांनी सोमवारी अटक केली. नमनच्या वडिलांवर बँक मॅनेजर असताना 1.25 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मुलताई पोलिसांनी व्ही.के.ओझा यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी नमन ओझा हाही पोलिस ठाण्यात हजर होता. त्याने वडिलांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जामीन मिळाला नाही.
नमन ओझा हा भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एक कसोटी, एक वनडे आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय नमनने 113 आयपीएल सामनेही खेळले आहेत. नमनच्या कसोटीत 56 धावा, एकदिवसीय सामन्यात एक धाव आणि T20 मध्ये 12 धावा आहेत.