इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2022 चा मेगा लिलाव होणार आहे, कोणत्या फ्रेंचायझी संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवेल,याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान स्टार हिंदी कॉमेंट्रेटर आकाश चोप्रा यांनी सांगितले आहे की रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघ कोणत्या चार खेळाडूंना राखू शकेल आणि कोणत्या दोन खेळाडू साठी राईट टू मॅच (आरटीएम) कार्ड वापरू शकतात.आकाश चोप्राने विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सचा समावेश कायम ठेवलेल्या चार खेळाडूंच्या यादीत केला आहे, परंतु अन्य दोन नावे जरा आश्चर्यचकित करणारी आहेत.आकाश चोप्राने दोन अनुभवी खेळाडूंवर पैज लावली असतानाच त्याने आतापर्यंत आरसीबीसाठी फारसे सामने खेळलेले नसलेले एक क्रिकेटपटू निवडले आहे.
आकाश च्या म्हणण्यानुसार,'मी युजवेंद्र चहल आणि देवदत्त पडीक्कल यांना विराट आणि एबीडीनंतर तिसर्या क्रमांकावर घेईन. खरं सांगायचं झालं तर मला तीन भारतीय खेळाडू कायम ठेवण्याची इच्छा आहे.परदेशी खेळाडू म्हणून विराट कोहली, युजवेंद्र चहल आणि देवदत्त पद्लिकल आणि एबी डिव्हिलियर्स अशा प्रकारे आरसीबीमध्ये चार खेळाडू कायम असू शकतात.
आकाश चोपडा असे मानतात की मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल अशी दोन संघ आहेत, ज्यात असे चार खेळाडू आहेत, जे फ्रँचायझी संघ निश्चितपणे टिकवून ठेवू इच्छित आहेत.आरसीबीसाठी आकाश म्हणे की विराट कोहली राखून ठेवण्याची संघाची पहिली निवड असेल आणि दुसर्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स असेल.2020 च्या आयपीएलमध्ये आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता, तर संघाने यंदा पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.