द्रविड ठरला 50 वर्षातला सर्वोत्तम कसोटीपटू

गुरूवार, 25 जून 2020 (20:06 IST)
विस्डेन इंडियाने सोशल मीडियावर घेतलेल्या पोलमध्ये भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड गेल्या 50 वर्षातला भारताचा सर्वोत्त कसोटीपटू ठरला आहे. विस्डेन इंडियाच्या सोशल मीडिया पेजवर घेण्यात आलेल्या या पोलमध्ये
डूंशी विस्डेन इंडियाने हा पोल सुरु केला होता. ज्यात  राहुल आणि सचिनसह विराट, सुनील गावसकर अशा दिग्गज खेळाडूंचा सहभाग होता. गावसकर यांनी या पोलमध्ये विराटवर मात करत तिसरे स्थान पटकावले आहे. आपल्या कारकिर्दीत राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करायचा, त्याचप्रमाणे राहुलने या पोलमध्येही अखेरपर्यंत लढा देत बाजी मारल्याचे विस्डेन इंडियाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 
 
द्रविडने आयुष्यभर द वॉल हे बिरुद मिरवले. आपली तंत्रशुद्ध फलंदाजी आणि भक्कम बचाव यासाठी तो ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याने भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपदही भूषविले. सध्या तो बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये राहुलने केलेल्या कामगिरीबद्दल  त्याला कधीही पुरेसे श्रेय मिळत नाही, अशी अनेकदा चर्चा रंगत असते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती